LPG Price Hike : आज फेब्रुवारी असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची झोप उडाली आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमती यामुळे तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, 19 किलोग्रॅमच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तुमच्या शहरात गॅस सिलिंडरच्या किमती किती? LPG Price Hike
नवे दर अपडेट झाल्यानंतर आजपासून राजधानी दिल्लीत LPG सिलेंडरची किंमत 14 रुपयांनी वाढून (LPG Price Hike) प्रति सिलेंडर 1769.50 रुपये झाली आहे. कोलकातामध्ये 18 रुपयांनी वाढ झाली असून त्याठिकाणी गॅस सिलिंडरच्या किमती 1887 रुपये झाली आहे. मुंबईत सुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 15 रुपयांनी वाढून 1723.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. तर चेन्नई मध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 12.50 रुपयांनी वाढून 1937 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.
घरघुती सिलिंडरच्या किमती जैसे थे –
दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत (LPG Price Hike) कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14 किलोचा सिलेंडर 903 रुपयांना मिळत आहे . त्याचप्रमाणे मुंबईत 902 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे. यापूर्वी 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यावेळी तब्बल 200 रुपयांनी सिलिंडर स्वस्त करत केंद्र सरकारने गृहिणींना गिफ्ट दिले होते त्यानंतर हि किंमत अशीच कायम आहे.