LPG Price Hike : गॅस सिलिंडर महागला; सर्वसामान्यांना मोठा झटका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ (LPG Price Hike) झाली आहे. मात्र हि दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढलेल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी हि नवीन दरवाढ लागू केली आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढले होते, आता या किमती आणखी महाग झाल्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडणार नाही.

कोणत्या शहरात किती दर ? LPG Price Hike

IOCL च्या वेबसाइटनुसार, दिल्ली ते मुंबई पर्यंत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून लागू करण्यात आल्या आहेत. नवीन भाववाढीनंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1652.50 रुपयांवरून 1691.50 रुपये झाली आहे. कोलकाता शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत आता 1764.50 रुपयांवरून 1802.50 रुपये झाली आहे. म्हणजेच येथे 38 रुपयांनी गॅस सिलेंडर महागला आहे. तर, मुंबईत या 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1644 रुपये झाली आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 1855 रुपयांना उपलब्ध झाला आहे.खरं तर आपण बघितलं तर जुलैनंतर सातत्याने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहे. (LPG Price Hike)

घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर –

एकीकडे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत, तर दुसरीकडे तेल विपणन कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दीर्घकाळापासून कायम ठेवली आहेत. 14 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना मुंबईत 802.50 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपये, दिल्लीत 803 रुपये आणि कोलकात्यात 829 रुपयात मिळत आहे.