विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर यावर्षी डिसेंबर महिन्यात निवृत्त होणार आहे. त्यामुळे लष्करप्रमुखपदासाठी एम एम नरवणे तसेच सैन्याचे उत्तरेतील कमांडर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांचं नाव चर्चेत आहे. नरवणे यांची नियुक्ती झाल्यास त्यांच्या रुपाने मराठी व्यक्तीची लष्करप्रमुखपदी निवड होईल.
कोण आहेत मनोज नरवणे?
– मनोज नरवणे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत.
– एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतलं.
– जून १९८० मध्ये ते ७ शीख लाईट इन्फंट्रीमधून लष्करात दाखल झाले.
– लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
– म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून काम केलं आहे.
– काही महिन्यांपूर्वी लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदावरुन कोलकातामधील पूर्व कमांडच्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली
– त्यानंतर त्यांची भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी नेमणून करण्यात आली.
– बिपीन रावत यांच्या जागी आता लष्करप्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
भारतीय सैन्याच्या उपप्रमुखपदी मराठी माणसाची नेमणूक झाली आहे. ईस्टर्न आर्मी कमांडर, लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कर उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान लष्कर उपप्रमुख देवराज अंबू ३१ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी एम एम नरवणे यांची वर्णी लागली आहे.