राजनाथ सिंह यांच्या विरोधात लढणार ‘या’अभिनेत्रीची आई

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ (उत्तर प्रदेश ) | केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या विरोधात कॉंग्रेसला उमेदवार  सापडत नसताना समाजवादी पक्षाने सिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांच्या आईला लखनऊ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे ठरवले आहे.

सोनाक्षी सिन्हा यांच्या आई आणि शत्रुग्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा यांनी आज मंगळवारी समाजवादी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले आहे. पूनम सिन्हा उद्या बुधवारी १७ एप्रिल रोजी आपला लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शत्रुग्न सिन्हा हे बिहार मधील पठाण सहाब लोकसभा मतदारसंघातून  कॉंग्रेसच्या उमेदवारीवर लोकसभ निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद निवडणूक लढत आहेत.

दरम्यान लखनऊ मतदार संघातून कॉंग्रेसला मात्र उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे कॉंग्रेस मताचे विभाजन टाळायच्या नावाखाली या मतदारसंघात समाजवादी पक्षाला पाठींबा देणार आहे. लखनऊ मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले  आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपला आणि  अटलजींना मनाणारा मतदार आहे. त्यामुळे येथून भाजपचा उमेदवार सहज निवडणूक जिंकून येतो.