नवीन M2 चिप सहित येणार MacBook Pro आणि MacBook Air, फीचर्स जाणून घ्या

MacBook Pro
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MacBook Pro : Apple च्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये कंपनीकडून Apps आणि सॉफ्टवेअरची ऑफर दिली जाते, मात्र यावेळी कंपनीकडून हार्डवेअरबाबतची घोषणा केली गेली आहे. Apple ने या वर्षी M2 चिप आणि ती बसवलेले दोन मॅकबुक्स लाँच केले आहेत. यामध्ये MacBook Air आणि 13-इंच MacBook Pro चा समावेश आहे. या नवीन MacBook Air मध्ये 13.6-इंचाचा liquid retina डिस्प्ले मिळेल, त्यासोबतच 1080p HD कॅमेरा देखील मिळेल.

या नवीन MacBook Air च्या डिस्प्लेमध्ये एक नॉच देखील देण्यात आला आहे. यामध्ये सिल्वरप, स्पेस ग्रे, मिडनाईट आणि स्टारलाइट हे चार कलर देण्यात आले आहेत. याशिवाय Apple ने यामध्ये 1080p HD कॅमेरा देखील दिला आहे. तसेच यामध्ये चार स्पीकरही देण्यात आले आहेत. यासोबतच यातएक हेडफोन जॅक देखील आहे, जो high-impedance हेडफोन्स सपोर्ट देतो.

Revue de tests des MacBook Pro M1 Pro/Max : les nouvelles références  ultimes | MacGeneration

या नवीन Apple MacBook Air मध्ये मॅगसेफ चार्जिंगची सुविधा देखील मिळेल. यामध्ये पॉवरसाठी 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. कंपनीने असा दावा केला आहे की याची 18 तासांची बॅटरी लाइफ आहे. तसेच युझर्सना एकाच वेळी दोन डिव्हाइस चार्ज करता येईल.

MacBook Air ची किंमत किती असेल ???

M2 प्रोसेसर असलेल्या या Apple MacBook Air ची किंमत $1099 म्हणजेच सुमारे 85,509 रुपये असेल.

God of War on the MacBook Air proves Apple accidently made a gaming laptop  | TechRadar
MacBook Pro मध्ये 24GB युनिफाइड मेमरी, ProRes एक्सेलेरेशन आणि 20 तासांची बॅटरी लाईफ दिली आहे. Apple ने या MacBook Pro मध्ये 13 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा मॅकबुक एअर पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच, M2 प्रोसेसर असलेला MacBook Pro देखील पुढील महिन्यापासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल.

MacBook Pro ची किंमत किती आहे ???

M2 प्रोसेसर असलेल्या या MacBook Pro ची किंमत 1,01,067 रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, M1 प्रोसेसरसह मागील M1 MacBook Air जवळपास 77,726 रुपयांमध्ये मिळत आहे.

MacBook Air With M1 Chip Still a Great Buy in 2022

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.apple.com/in/macbook-air/

हे पण वाचा :

पहिल्या वर्धापनदिनालाच पुन्हा ‘अडकले’ Income Tax पोर्टल, विभागाने इन्फोसिसला फटकारले

Drugs : भारत-पाक सीमेवर 15 कोटी किंमतीचे साडेतीन किलो हेरॉईन जप्त

‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिले दुप्पट पैसे !!!

Investment : लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे कसे फायदेशीर असते ??? अशा प्रकारे समजून घ्या

HDFC चा ग्राहकांना धक्का !!! सात दिवसांत दुसऱ्यांदा कर्जाच्या व्याज दरात वाढ