सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी मदन माधवराव भोसले (बावधन) यांची तर व्हाईस चेअरमनपदी शंकरराव पर्बती शिंदे (पांडेवाडी) यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक जी. टी. खामकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या.
बैठकीस नूतन संचालक मदन भोसले, शंकरराव शिंदे, शिवाजीराव पिसाळ, बाजीराव महागडे, दिलीप वाडकर, रामदास पोळ, संजय कांबळे, सुनील संकपाळ, सुरेश खरात, विठ्ठल शिंदे, आनंदा चिरगुटे, अंकुश कांगडे, रामदास इथापे, सुरजित जाधवराव, विठ्ठल फरांदे, हेमलता जाधव हे उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे सहाय्यक निबंधक जी. टी. खामकर, सुत गिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, भुईंज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार यांनी शुभेच्छा देऊन माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन खरेदी विक्री संघ ऊर्जितावस्थेत आणला आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमन अनुभवी असल्याने ते निश्चित कारभार उत्तम पद्धतीने करून स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील ,जननायक आमदार मकरंद आबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचा नावलौकिक वाढवतील.
यावेळी दिलीपराव पिसाळ, मोहन जाधव, रमेश गायकवाड, भैय्या डोंगरे, लक्ष्मण पिसाळ, बाळासाहेब मांढरे, राजेंद्र सोनवणे, किरण जाधव, संजय चौधरी, अरविंद कुदळे, अनिल सावंत, चरण गायकवाड, सतीश कांबळे, राजेंद्र कदम, मधुकर चौधरी, मधुकर साळुंखे, प्रभाकर चौधरी, अभिजीत फरांदे आदींनी अभिनंदन केले.