समाधानकारक ! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; दीड हजार चाचण्यांमध्ये केवळ एक पॉसिटीव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मागील दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. याला औरंंगाबाद शहर देखील अपवाद नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धडक मारली आणि पुन्हा एकदा हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या, त्यामध्येच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेकडून बाहेरून येणाऱ्या नागरिकांची शहरातील इंट्री पॉईंटवर कोरोना टेस्ट केली जात आहे.

काल रविवारी शहरातील सहा इंट्री पॉईंट आणि विमानतळ तसेच रेल्वे स्थानक मिळून दिवसभरात 1 हजार 454 नागरिकांची अंतिजन टेस्ट करण्यात आली. समाधानकारक म्हणजे यामध्ये केवळ एकाच अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. तर इतर लोकांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कुठेतरी कोरूना चा प्रादुर्भाव कमी होत आहे असे दिसून येत आहे.

काल झालेल्या चाचण्यांमध्ये चिकलठाणा एंट्री पॉइंटवर 259, हर्सूल टी पॉइंटवर 122, कांचनवाडी 146, झाल्टा फाटा 272, नगर नाका 300, दौलताबाद टी पॉइंटवर 207 जणांची तर शहरातील रेल्वे स्थानकावर 127 तर विमानतळावर 21 प्रवाशांची ॲंटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली.

Leave a Comment