राजगढ : हॅलो महाराष्ट्र – सध्या सोशल मीडियावर महिलेसोबत अतिशय वाईट आणि अमानुष पद्धतीनं वागणूक (man slapped a female) केल्याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या महिला कर्मचाऱ्याने आधार कार्ड मागितले त्याचा राग आल्याने एका व्यक्तीने या महिला कर्मचाऱ्याच्या कानशिलात (man slapped a female) लगावली आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
#WATCH| Madhya Pradesh: A man slapped a female toll operator after being refused to leave without paying tax in Rajgarh
A case has been registered against the accused for the incident dated Aug 20. Soon he'll be arrested: Ramkumar Raghuvanshi, Biaora PS in-charge
(Source: CCTV) pic.twitter.com/bbdkinLPZf
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) August 21, 2022
या आरोपी व्यक्तीने कर्मचारी महिलेवर हात उचलला आणि तिच्या कानशिलात (man slapped a female) लगावली. त्यानंतर महिलेनंही चप्पल उचलून व्यक्तीला मारहाण केली. यानंतर त्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला आणि त्यानंतर काही वेळानं आपल्या साथीदारांसोबत आला. त्यांनी मिळून टोलनाक्याची तोडफोड केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगढ परिसरातील एका टोलनाक्यावर घडली आहे.
काय घडले नेमके ?
आरोपी राजकुमार गुर्जरला महिला कर्मचाऱ्याने रोखलं. मी लोकल परिसरातील आहे असं त्याने सांगितलं. त्यावर महिलेनं राजकुमारला आधारकार्ड मागितलं. मात्र त्याने देण्यास नकार दिला. तिथे दोघांची बाचाबाची झाली. राजकुमारने महिलेच्या कानशिलात (man slapped a female) लगावली. एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने महिलेची ओढणी ओढली आणि जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?