हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भाद्रपद महिन्यामध्ये तब्बल दहा दिवस गणपती बाप्पा घरोघरी आगमन करतात. कोणाच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवस बसतात, तर कुणाच्या अडीच आणि कोणाच्या पाच दिवस. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु त्यापूर्वी माघ महिन्यात महाराष्ट्रामध्ये माघी गणेशोत्सव साजरी केला जाईल. त्यामुळे हा गणेश उत्सव कधी असेल? तो का साजरी करण्यात येतो? हे आपण जाणून घेऊयात.
माघी गणेशोत्सव तिथी
माघ चतुर्थीला गणेश जयंती साजरी करण्यात येते. या चतुर्थीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. महाराष्ट्रात काही ठिकाणी या काळात दीड दिवसांचा गणपती बसवला जातो. या वर्षांमध्ये चतुर्थी 12 फेब्रुवारी आली आहे. चतुर्थीचा कालावधी संध्याकाळी 05 : 44 वाजेपासून सुरू होईल ते 13 फेब्रुवारीला दुपारी 02 : 41 वाजता संपेल. या काळात गणेश पूजेचा शुभ मुहूर्त 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:40 ते दुपारी 01:58 वाजेपर्यंत असेल.
माघी गणेशोत्सव म्हणजे काय?
हिंदू धर्मामध्ये गणेशाचे तीन अवतार मानले जातात. यानुसार तिने अवतारांचा वेगवेगळ्या तिथीला जन्म झाला असे म्हणतात. हिंदू धर्मात असे मानतात की, विनायक अवताराचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला. तर पार्थिव गणेशाचा जन्म भाद्रपद शुक्ल चतुर्थीला झाला. तसेच, माघी शुक्ल चतुर्थीला गणेशाचा जन्म झाला, असे म्हणतात.
जुन्या आख्यायिकेत अशी कथा आहे की, असुरांचा वध करण्यासाठी गणपतीने तीन वेळा जन्म घेतला होता. माघी महिन्यातील तिथीला गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायकाच्या अवतारात जन्म घेतला होता. यामुळेच या तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते.