विशेष प्रतिनिधी । अरबी समुद्रात तयार झालेलं हे “महा” चक्रीवादळ पुढील दोन दिवसात पालघर मध्ये धडकणार असल्याची माहिती हवामान खात्यामार्फत देण्यात आली आहे. या महा चक्रीवादळाचा फटका पालघरसह ठाणे जिल्ह्याला बसण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे. या चक्रीवादळामुळे १०० ते १२० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहणार असून यामुळे पालघर सह ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टी चा इशारा देखील देण्यात आला. चक्रीवादळा मुळे पालघर आणि ठाणे जिल्हयांतील नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान समुद्रात मासेमारी करण्यास गेलेल्या मच्छीमारांना ही समुद्रकिनारी परत येण्याचे तसेच पुढील तीन ते चार दिवस मासेमारी करण्यास समुद्रात न जाण्याचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेत. या महा चक्रीवादळाचा फटका किनारपट्टी भागातील गावांना सर्वाधिक बसणार असून सतर्कता म्हणून किनारपट्टी भागातील शाळांना गरज भासल्यास पुढील तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांसाठी पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालघर जिल्हाधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांच्याकडून करण्यात आल आहे.