Maha Vikas Aghadi : पवार- ठाकरेंसमोरच पृथ्वीराज चव्हाणांची मोठी घोषणा!! महाविकास आघाडी एकत्र विधानसभा लढवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणूक एकत्रित लढली आणि आम्हाला यश मिळालं त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडी आणि अन्य छोटे- मोठे पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत अशी मोठी घोषणा काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आज मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांच्याउपस्थितीत महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते बोलत होते.

महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार – Maha Vikas Aghadi

लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. लोकसभा निवडणुकीत आम्ही ३ पक्ष जरी एकत्र असलो तरी महाराष्ट्रातील आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी, कम्युनिष्ट पक्ष, ३० हुन अधिक संघटना आमच्या सोबत होत्या. या सर्वानी मेहनत केली, महाराष्ट्रात वातावरण निर्मिती करण्यात त्यांनी मोठा वाटा उचलला होता. यापुढच्या निवडणुका सुद्धा आम्ही अशाच एकत्रितपणे लढवणार आहोत. पूर्ण ताकदीने एकत्रितपणे आम्ही मैदानात उतरणार आहोत असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटल. महारष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा पाठिंबा आणि आशीर्वाद दिला, असाच किंवा यापेक्षाही जास्त आशीर्वाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला मिळेल अशी अपेक्षा पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

मोदींच्या सभा झाल्या तिथे महायुतीच्या जागा पडल्या – पवार

यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना खोचक टोला लावला. महाराष्ट्रात देशाच्या पंतप्रधानांच्या 18 सभा आणि एक रोड शो झाला. त्यांच्या 18 सभा आणि रोड शो झाला त्याठिकाणी आमच्या उमेदवारांना जनतेने फार मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांच्या जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढं आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने स्पष्ट वाटचाल होईल. त्यामुळे पंमोदींना धन्यवाद देणं हे मी माझं कर्तव्य समजतो, असा टोला पवारांनी लगावला.