महाबळेश्वर दवबिंदूने गोठले : थंडीचा कडाका वाढला, पारा 6 अंशावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा कडाका आज अचानक वाढला आहे. महाराष्ट्राचे मिनी काश्मिर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा पारा तब्बल 6 अंशावर आल्याने महाबळेश्वरच्या अनेक भागात दवबिंदू गोठले आहेत. वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. वेण्णा लेक परिसरात ज्या ठिकाणी बोट उभ्या केल्या जातात त्या जेटीवर, गाड्यांच्या टपांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू गोठल्याचे पहायला मिळाले. या भागात पडत असलेल्या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वर मध्ये येत असतात. लिंगमळा भागात गवंतांवर फुलांवर दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे. गेल्या महिन्यात 12 जानेवारीला महाबळेश्वरचा पारा शुन्यावर गेल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडलेले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात थंडीचा कडाका काहीसा कमी झाला होता. मात्र आज पुन्हा थंडी वाढल्याने महाबळेश्वमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने अनेक ठिकाणी दवबिंदू पहायला मिळाले.

महाबळेश्वर शहरात पर्यटक शॅाल, स्वेटर, कानटोपी परीधान करुन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो. हिमकण वेण्णालेकच्या परीसरात बोटीवर व झाडांच्या पानावर पाहयला मिळतात. पर्यटक व सर्वसामान्याना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो.