महाबळेश्वर गारठले : तापमानाचा पारा शून्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाराष्ट्राच नंदनवन असलेल्या महाबळेश्वरला थंडीचा कडाका वाढलेला आहे. आज बुधवारी दि. 12 रोजी महाबळेश्वरचा पारा शुन्यावर गेल्याने वेण्णालेक व लिंगमळा येथे हिमकण पडायला सुरवात झाली आहे. महाबळेश्वरला वाढलेल्या थंडीमुळे कश्मिरच्या हिमकण दुलईचा अनुभव पर्यटक व नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/893682541326965

गतकाही दिवसापासून महाबळेश्वर शहर व परीसरात थंडीचा कडाका वाढला आहे. रात्री वेण्णालेक परीसरात पर्यावरणप्रेमीनी महाबळेश्वर शहराच्या थंडीच्या तापमान तपासले असता, महाबळेश्वरचा पारा शुन्यावर असल्याचे तापमान मापकाने दर्शवले. महाबळेश्वर शहराला विविध रुपे पाहयला मिळतात. समुद्र सपाटी पासुन 3 हजार फूट उंचावर असलेल्या शहरात कमालीची थंडीचा अनुभव सदैव पहायला मिळतो.

महाबळेश्वर शहरात पर्यटक शॅाल, स्वेटर, कानटोपी परीधान करुन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. वेण्णालेक व लिंगमळा परीसरात गारठा महाबळेश्वर शहरापेक्षा जास्त तीव्रतेने जाणवतो. हिमकण वेण्णालेकच्या परीसरात बोटीवर व झाडांच्या पानावर पाहयला मिळतात. पर्यटक व सर्वसामान्याना महाबळेश्वरमध्ये हिमकण पाहायला मिळणं निसर्गाचा आविष्कार मानला जातो. मंगळवारी महाबळेश्वर येथील तापमानाचा पारा 4 अंशावर होता तर आज शून्यावर गेला आहे.

Leave a Comment