Wednesday, March 29, 2023

महाबळेश्वर, पाचगणीत व्हॅक्सिनेशन टुरिझम अंतर्गत हाॅटेल उघडण्यास परवानगी द्यावी : डी. एम. बावळेकर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

महाबळेश्वर व्हॅक्सिनेशन टुरिझम या संकल्पनेसाठी महाबळेश्वर पांचगणी येथील हॉटेल इंडस्ट्रि उघडण्यास परवानगी मिळावी. आम्ही शासनाचे सर्व नियम पाळण्यास तयार आहोत. आम्ही आमच्या स्वखर्चाने कोरोना लसीचे दोन डोस घेण्यासही तयार आहेत. पर्यटकांनाही आम्ही व्हॅक्सिनेशन टुरीझम अंतर्गत कोरोना लस उपलब्ध करून देवू. या साठी आम्हाला आमची हॉटेल उघडण्यास परवानगी दयावी, अशी मागणी महाबळेश्वर व पाचगणी येथील तीन हॉटेल संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनाव्दारे मागणी केली असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांनी केली.

- Advertisement -

या वेळी हॉटेल संघटनेचे अध्यक्ष मनिष तेजाणी, उपाध्यक्ष दिलीप जव्हेरी, लहान हॉटेल संघटनेचे अध्यक्ष असिफ सय्यद, कोषाध्यक्ष रोहन कोमटी व योगेश बावळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डी. एम. बावळेकर म्हणाले, महाबळेश्वर व पाचगणी ही दोन जुळी पर्यटनस्थळे असुन या दोन्ही शहरास भेट देण्यासाठी भारताच्या विविध राज्यातुन साधारण वीस लाख पर्यटक येतात. पर्यटनावरच येथील विविध व्यवसायिकांसह सर्वांचे जीवन अवलंबून आहे.

येथील दोन्ही पर्यटनस्थळे मागील 14 महीन्यात 4 महीन्यांचा अपवाद वगळता दहा महीने लॉकडाउन मुळे बंद पडली आहेत. त्यामुळे पर्यटनावर अवंलुबन असलेल्या येथील सर्वच घटकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. महाबळेश्वर येथे 30 मोठी स्टार दर्जाची हॉटेल असुन लहान हॉटेल व लॉज यांची संख्या दोनशेच्या जवळपास आहे. महाबळेश्वर व पाचगणी येथे 800 टॅक्सी व्यवसायिक व 450 घोडे व्यवसायिक आहेत त्याच प्रमाणे गाईड कॅन्व्हसर, टपरीधारक, हातगाडीवाले, स्ट्रॉबेरी विक्रेते, पथारी वाले यांचीही संख्या लक्षणीय आहे. या प्रत्येकाची आर्थिक स्थिती हालाखिची झाली आहे. शहरात केवळ दोनच कोरोनाचे रूग्ण असुन लवकरच महाबळेश्वर हे कोरोना मुक्त होईल.