सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद व नेस्ले प्रणित हिलदारी अभियाना अंतर्गत 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाबळेश्वर शहरातील तापोळा रोडवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता मोहिमेद्वारे तापोळा रोडवरील रस्त्याच्या आजूबाजूला पडलेला एकूण 45.245 किग्रॅ कचरा गोळा करण्यात आला. यात 18.44 किग्रॅ काचेच्या बाटल्या, 12.315 किग्रॅ पुठ्ठा, 6.805 किग्रॅ चिप्स, बिस्कीटची रिकामी पाकिटे, 2.205 किग्रॅ व्हाईट प्लास्टिक, 5.480 किग्रॅ प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी कचरा गोळा करण्यात आला.
सदर मोहिमेसाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक पल्लवी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आबा ढोबळे, बबन जाधव, सचिन दीक्षित, वैभव साळुंके व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. सदर मोहिमेत हिलदारी टीम सोबतच मनोज चव्हाण, रोहित बांदल, श्रावण कांबळे, राकेश भोसले, संतोष फळणे, आकाश शेलार, सूनिल जाधव, निलेश कोंढाळकर, निसार डोंगरे, राजू नालबंद, संजय सपकाळ, विशाल उतेकर, दीपक कदम, किरण वाघदरे, प्रवीण जाधव, तुकाराम घाडगे, प्रकाश जाधव, पांडुरंग जंगम, नागेश जाधव, आकाश खरे, राहुल जाधव, यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
हिलदारी टीमचे डॉ. मुकेश कुलकर्णी, राम भोसले, सुजित पेंडभाजे, दुर्गेश जाधव, अभिषेक जाधव, खाकसारअली पटेल, गणेश माचुतरे, आरतीका मोरे, अमृता जाधव, गौरी चव्हाण, क्षितिजा जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले. सदर स्वच्छता मोहिमेची सांगता “माझी वसुंधरा” अभियानाची शपथ घेऊन करण्यात आली.