अगोदर होता पाग्या, मग झाला वाघ्या…”; भाजपाची शिवसेनेवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईतील एका उद्यानाला टिपू सुलतान असे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सध्या या वरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्याकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. दरम्यान या मुद्द्यावरून आज भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. “ही तर संधीसाधू सेना… कॉंग्रेसने जन्माला घातली, मुस्लिमलीगच्या मांडीवर बसली. आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या , त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!,” अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

केशव उपाध्ये यांनी ट्विट करीत शिवसेनेवर निशाण साधला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ही तर संधीसाधू सेना… कॉंग्रेसने जन्माला घातली. मुस्लिम लीगच्या मांडीवर बसली, कॉंग्रेससोबत रमली, कॉंग्रेसशी दोस्ती केली, पीएसपीशी गाठ बांधली, आणि सारे फसल्यावर हिंदुत्वाचा घोष करीत भाजपसोबत आली… आधी होता पाग्या, मग झाला वाघ्या. त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना!”असे ट्विट उपाध्ये यांनी केली.

मुंबईतील मालाडच्या एका क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नाम करणावरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद सुरू आहे.या मुद्द्यावरून प्रजासत्ताक दिनी भाजपाने मालाडमधील क्रीडा संकुलासमोर आंदोलनही केले. दरम्यान यावरून उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Leave a Comment