भगवान श्रीराम.. का बाहुबली..?; रामयुग सिरीजची झलक पाहून शकुनी मामांचा झाला संताप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्री कृष्ण’ ह्या ८०-९०च्या काळातील अश्या आध्यत्मिक मालिका आहेत ज्या पाहून प्रेक्षक अत्यंत मंत्रमुग्ध झाला आहे. आजही या मालिका आणि या मालिकेतील अध्यात्मिक पात्र साकारणारे कलाकार लोकांच्या आठवणीत वसले आहेत. गतवर्षी कोरोनाच्या काळात जेव्हा सगळेच आपापल्या घरात बंदिस्त झाले होते. तेव्हा माध्यमांकडून पुन्हा एकदा या मालिकांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. दरम्यान लाखो लोकांनी पुन्हा एकदा रामायण पाहिले होते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमध्ये ‘रामायण’ पुन्हा प्रसारित झाले नाही. दरम्यान चित्रपट निर्माता कुणाल कोहली याने ‘रामयुग’ ही वेब सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस आणली. याबाबत प्रतिक्रिया देताना महाभारतातील शकुनी मामा साकारणारे अभिनेता गुफी पेंटल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यह कैसी रामायण है???

 

एमएक्स प्लेअरवर ६ मे २०२१ रोजी ‘रामयुग’ वेब सीरीज प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत भगवान रामाची कहाणी एका वेगळ्या अंदाजात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जे बर्‍याच प्रेक्षकांना आवडलेले नाही. त्यापैकी एक म्हणजे महाभारतात ‘शकुनी मामा’ साकारणारे अभिनेता गुफी पेंटल. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून निर्मात्यांना फटकारत ‘रामयुग’विषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओत ते म्हणाले, ‘मी रामयुगची एक झलक पाहिली आहे. नवीनता आणण्याच्या उत्कटतेमध्ये निर्माते इतक्या दूर का जातात?, ही फार खेदाची बाब आहे. यामध्ये कलाकारांचा पोशाख बरोबर नाही, वातावरणही ठीक नाही किंवा त्यांचा गेटअपही चांगला नाही. मला वाटलं की, रामयुगात काहीतरी नवीन पाहता येईल आणि या पिढीला काहीतरी नवीन मिळेल.’

https://www.instagram.com/p/CO2lnuGJHsw/?utm_source=ig_web_copy_link

पुढे म्हणाले की, ‘आपण नेहमीच भगवान राम, सीता माता, हनुमान आणि भगवान शिव यांची प्रतिमा अनेक ठिकाणी पाहिली आहे. तीच छवी आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, निर्मात्यांनी हीच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही ते इतके आधुनिक केले आहे की, भगवान रामाचा अवतार बाहुबलीसारखा दिसतो आहे.’ ‘मला माहित आहे की या मालिकेसाठी बरीच रक्कम खर्च केली गेली आहे. मी देखील एक चित्रपट निर्माता आहे. कोट्यावधी रुपये खर्च करा परंतु, आधी थोडेसे संशोधन करा, लोकांच्या भावनांशी खेळू नका.

https://www.instagram.com/p/CEDkZBop8hU/?utm_source=ig_web_copy_link

यातील नायक आजच्या धाटणीचा आहे, साड्या आधुनिक आहेत, कपडे आधुनिक आहेत. हे पाहिल्यानंतर असे दिसते की हे लोक नाटक करत आहेत. समजा तुम्ही खूप पैसा गुंतवला आहे, जर तुम्हाला भारतीयांच्या मनापर्यंत पोहोचवायचे असेल, तर तुम्ही त्यांची वेशभूषा बदलू शकत नाही. शतकानुशतके हे आपल्या मनात हीच प्रतिमा आहे. ही गोष्ट योग्य नाही! यात ग्राफिक्स चांगले आहे. पण, त्यामध्ये अधिक श्रद्धा, कृपा आणि भक्ती असावी.

https://www.instagram.com/p/COPPJIyHppj/?utm_source=ig_web_copy_link

‘यावेळी बोलताना गुफी पेंटल यांनी जुन्या रामायणाची स्तुती केली आहे. ते म्हणाले कि, ‘रामानंद सागर यांनी सर्वोत्कृष्ट रामायण तयार केले होते, म्हणूनच अरुण गोविलजी अजूनही भगवान रामाप्रमाणे पूजले जातात. दीपिका अजूनही सीता मानली जाते आणि सुनील लाहिरी यांना आजही ‘लक्ष्मण’ असे म्हटले जाते. या मालिकेत राम आणि रावण सारखेच दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/COmhYjaHKy2/?utm_source=ig_web_copy_link

या दोघांमध्ये काहीही फरक नाही. भाषेचे देखील भान नाही, याच चक्क ‘छोकरे’ हा शब्द वापरला गेला आहे.’ ‘आपली संस्कृती दहा हजार वर्ष जुनी आहे. आपले संस्कार कुठे गेले? कोहली सर खूप चांगले फिल्म मेकर आहेत. मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपण आजच्या पिढीला हे असे रामायण सांगणार आहात का? ग्राफिक्स वगळता यात काहीही दिसत नाही. कृपया, असे काहीही करण्यापूर्वी संशोधन करा.’, असा सल्ला त्यांनी दिग्दर्शक कुणाल कोहली यांना दिला आहे.

Leave a Comment