साताऱ्यातील महादरे गाव बनलं देशातील फुलपाखरांचं पहिलं गाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्या जवळ महादरेच्या वनक्षेत्राला मुंबईत झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ‘फुलपाखरू संवर्धन राखीव’ म्हणून नुकतीच मान्यता देण्यात आली. त्यामुळे महादरे हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतील हे पहिलं फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र ठरले आहे.

बिबट्यापासून फुलपाखरांपर्यंत वन्यजीवांचा मुक्त विहार, निखळ पाण्याचे निर्झर, पाठीशी यवतेश्वरचा डोंगर, हिरवीकच्च जंगल झाडी, कोणालाही मोहित पाडावं अशी ओळख महादरेच्या जंगलाची आहे. राजवाड्यापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. पश्चिम घाटात 360 प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी 160 प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात.

येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे 106 हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. तेवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. उलट या क्षेत्राचे संरक्षण, संगोपन आणि नैसर्गिक विकासासाठी मनुष्यबळ व आर्थिक तरतूद शासन करेल, असे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी स्पष्ट केले.

रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध

सातारा येथील राजवाड्यापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या महादरे येथील जैवविविधता अलौकिक आहे. किर्र जंगलात पक्षांच्या किलबिलाटात निसरड्या पायवाटा तुडवत जंगलभ्रमणती अनुभवण्याची संधी निसर्ग पर्यटकांना यानिमित्ताने चालून आली आहे. त्याचबरोबर गावातील व परिसरातील स्थानिकांना देखील गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment