महाडिक गटाचा सहकार पॅनेलला पाठिंबा

0
72
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

इस्लामपूर तालुक्यातील पेठ नाका येथे कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाडिक बंधूंनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी महाडिक गटाने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला मंगळवारी जाहीर पाठिंबा घोषित केला आहे.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास राहुल महाडिक, सम्राट महाडिक, ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती जगन्नाथ माळी, कृष्णा बँकेचे संचालक नामदेवराव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राहुल महाडिक म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. बैठकीत भोसले गटाला पाठिंबा देण्यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांचा कल होता. नानासाहेब आणि भोसले परिवार यांचा जिव्हाळा होता. अतुलबाबा भोसले हे आमचा शब्दाला मान देतात. कृष्णा कारखाना सुरेशबाबांनी चांगला चालवला आहे. कोणावर टीकाटिप्पणी न करता अतुलबाबांशी असणारे मित्रत्वाचे पर्व पुढे चालवत, आमच्या गटाशी निगडित कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील.

सम्राट महाडिक म्हणाले, रेठरे कारखाना ते रेठरे धरण या दरम्यानच्या स्व. नानासाहेब यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील. आमच्या आजच्या या निर्णयामुळे कार्यक्षेत्रात उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महाडिक गटाने सहकार पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली हे स्वागतार्ह आहे. नानासाहेब यांच्या पश्चात राहुलदादा आणि सम्राटबाबा यांच्या पाठिंब्याने स्नेह आणखी घट्ट झाला असल्याचे प्रतिपादन माजी चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here