कराड शहरातील धोकादायक इमारतीवर पालिकेचा हातोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड पालिका दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतीच्या मालकांना इमारती उतरविण्याबाबत नोटीसा देत असते. इमारत मालकांना वेळोवेळी नोटीसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी मंगळवारी मंगळवार पेठेतील धोकादायक इमारतीवर कारवाई केली. त्यांच्या आदेशानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याचे मंगळवार पेठेतील धोकादायक इमारत पडली.

कराड पालिकेच्यावतीने यापूर्वीच संबंधित धोकादायक इमारतीमधील दुकानदार तसेच इमारत मालकांना इमारत धोकादायक असल्याबाबतची नोटीस दिली होती. इमारतीवर ही धोकादायक इमारत असल्याबाबत फलक लावण्यात आला होता. अशा प्रकारच्या पन्नासहून अधिक धोकादायक इमारती सध्या कराड शहरात आहेत.

या कारवाईबाबत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कराड शहरातील जेवढ्या ५२ इमारती धोकादायक आहेत. त्या इमारतींच्या मालकांना इमारती उतरवून घेण्याबाबत नोटीस दिलेल्या आहेत. काही इमारतींचा न्यायालयीन वाद सुरु आहे. मात्र, न्यायालयाच्या वादापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत. पालिकेच्यावतीने पाडण्यात आलेली इमारत हि धोकादायक असल्याने इमारत मालकांना इमारत उतरून घेण्याबाबत पालिकेकडून नोटीसही देण्यात आली होती. त्यानुसार आज कारवाई करण्यात आली आहे. मंगळवार पेठेतील इमारतीच्या कारवाईवेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मुख्याधिकारी रमाकांत डाके तसेच नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालिकेकडून मंगळवारी पाडण्यात आलेल्या मंगळवार पेठेतील इमारतीचा काही भाग आठवड्यात झालेल्या पावसामुळे ढासळला होता. यामध्ये घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या इमारतींबाबत सांगायचे झाल्यास गेल्या तीन वर्षापासून ही इमारत बंद अवस्थेत होती. गूलाब बागवान यांच्या मालकीची ही इमारत सूमारे 70 वर्षापूर्वी बांधली गेली होती. कराड पालिकेच्यावतीने आज सायंकाळी दोन जेसीबीच्या मदतीने ही इमारत पाडण्यास सुरुवात केली. या इमारतीमध्ये सात ते आठ दूकाने होती. यातील दत्त मेडिकल व घड्याळयाचे दूकान गत तीन वर्षापूर्वी बंद ठेवण्यात आले होते. तसेच इमारती मधील व्यवसायिकांना यापूर्वीच दूकान खाली करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या.

Leave a Comment