मुंबई | सर्वसामन्यांसाठी निराशाजन बातमी आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. महागाईची सरकारी आकडेवारी नुकतीच समोर आली असून महागाईने उच्चांक गाठल्याचे समजत आहे.
महागाईच्या सरकारी आकडेवारीनुसार महागाई दर ७.३५ % वर पोहोचला आहे. भाज्यांचा दरात ६० % नी वाढ झाली आहे तर डाळी १५.४४% नी महागल्या आहेत. मांस आणि मासे ९ टक्क्यांनी महागले आहेत तर फळे ४.४५ टक्के आणि
दुध ४ टक्क्यांनी महागले आहे. महागाईने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठल्याने आता सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत.
दरम्यान आता भाज्यापण ग्राम मध्ये मोजल्या जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढल्याने याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.