महाज्योतीचे कार्यालय मराठवाड्यातील भटक्या विमुक्त व इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी साहयभूत – मंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यात औरंगाबादचे ‘महाज्योतीचे’ कार्यालय मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी साहयभूत ठरणार आहे या कार्यालयामुळे खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर तसेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास सामाजिक न्याय भवन स्थित महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इतर मागास, बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केला.
सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते महाज्योतीच्या विभागीय कार्यालयाचे सामाजिक न्याय भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, आमदार संजय सिरसाट, महाज्योतीचे संचालक दिवाकर गमे, डॉ. बबनराव तायवाडे, नागपूर, लक्ष्मण वडले, प्रदीपकुमार डांगे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

गरिब, खेड्यापाड्यातील मजूर आणि शेतकरी कुंटुबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व कौशल्याधारित व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करुन देण्यात महाज्योतीचा महत्वाची वाटा आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना या योजनाचा लाभ घेता यावा यासाठी विभागीय पातळीवर या कार्यालयाची स्थापणा करण्यात आली आहे, असे कार्याक्रमात बोतलाना मंत्री वडेट्टीवर यांनी सांगितले. सिपेट आणि ग्रेस या संस्थाची महाज्योतीच्या उपक्रम व प्रशिक्षणासाठी निवड केली असून औरंगाबादची पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण या महाज्योतीच्या माध्यमातून दिले जाणार असल्याने ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्जल करण्यात महाज्योतीचे कार्यालय साहयभूत ठरणार असल्याचा विश्वास यावेळी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.उपक्रम व योजना याची माहिती पोहचवण्यासाठी ग्रामसभेत महाज्योतीच्या योजना व प्रशिक्षणाची माहितीविषयी ठराव मांडण्याच्या सूचना ग्रामविकास विभागामार्फत केल्या जातील. जेणेकरुन या योजनेची माहिती आणि लाभ खेड्यापाडयात पोहोचेल.

मंत्री संदीपान भूमरे यांनी महाज्योतीचे कार्यालय औरंगाबादला स्थापण केल्यामूळे मराठवाड्यातील मागासलेपणा दूर होण्यास बरोबरच भटक्या विमुक्त आणि शेतमजुरांच्या मुलांचे भवितव्य उज्जवल होण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदिपकुमार डांगे यांनी केले. यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण व योजनाची माहिती दिली. या कार्यक्रमात ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी साहयभूत ठरणाऱ्या टॅबचे वितरण उपस्थित मान्वरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात माध्यमिक व उच्च माध्यामिक आश्रमशाळा पुंडलिकनगर, जटवाडा ता. औरंगाबाद या शाळेतील चव्हाण करण नामदेव, राठोड सचिन मधु, चव्हाण अजय कडुबा, सिध्देश्वर राठोड, रमेश राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Leave a Comment