सिंधुदुर्ग प्रतिनिधी | नारायण राणे हे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार असून त्यांनी या बाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणे २०१४ साली झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत आहेत असे चित्र सध्या तळ कोकणात बघायला मिळते आहे. नारायण राणे कुडाळ विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे बोलले जाते आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीला नारायण याने यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. त्याचा वचपा कढण्यासाठी नारायण राणे सज्ज झाले आहेत असे बोलले जाते आहे. नारायण राणेंची एकाधिकारशाही वाढत गेल्याने नारायण राणे यांच्यावर शिवसेनेने कडाडून हल्ला केला. तेव्हा वैभव नाईक यया कामात आघाडीवर होते. त्यांनी नारायण राणे यांना मात देण्याचा चांगलाच प्रयत्न केला. त्यातूनच २०१४ साली नारायण राणे पराभूत झाले. त्याच पराभवाची सल नारायण राणे यांच्या मनात आजही आहे त्यामुळे ते स्वतः कुडाळ मधून विधानसभा लढणार आहेत.
मालवण-कुडाळ मतदारसंघातूनच नारायण राणे विधानसभा निवडणूक लढवतील. तुम्ही त्यांना साथ द्या,’ आश आशयाचं विधान नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यामुळे कुडाळ मतदारसंघात पुन्हा एकदा नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे वैभव नाईक अशी लढत रंगणार आहे.