Saturday, March 25, 2023

युतीचे जागा वाटप ; बार्शीची जागा भाजपला सुटणार ; आमदार दिलीप सोपलांच्या अडचणी वाढल्या

- Advertisement -

बार्शी प्रतिनिधी | शिवसेना भाजप युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली असून शिवसेना भाजपमध्ये काही जागांची अदला बदली होणार या बाबतचे वृत्त सूत्रांनी सोमवारीच दिले होते. त्यानंतर आता बार्शीची जागा भाजपसाठी सोडली जाणार असल्याचे बोलले जाते आहे. त्याबदल्यात भाजपने शिवसेनेसाठी विदर्भात जागा सोडली असल्याचे देखील बोलले जाते आहे.

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

- Advertisement -

बार्शी आणि करमाळा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यास शिवसेनेने अनुकूलता दाखवली आहे. युती अंतर्गत बंडाळी माजू नये म्हणून सेना भाजप असे निर्णय गुप्त ठेवू पाहत आहे. हि विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती आहे अशा आशयाचे मॅसेज सध्या सोशल मीडियात फिरू लागले आहेत. त्यामुळे वृत्तात सत्यता किती असू शकते याबद्दल खात्री देता येणार नाही. मात्र दिलीप सोपल शिवसेनेत जाणार हे वृत्त सर्वप्रथम सोशल मीडियातूनच आले होते. त्यामुळे या वृत्तास अविश्वसनीय मानणे देखील कठीणच जात आहे. त्यामुळे याबाबत राजकारणात काय हालचाली होतात हे बघावे लागणार आहे.

प्रकाश आंबेडकरांना आरएसएसची फूस : खासदार इम्तियाज जलील

बार्शीचे राजकरण हे पक्ष केंद्रित नराहता व्यक्ती केंद्रित राहिले आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि सध्या भाजपमध्ये असणारे राजेंद्र राऊत यांच्यात निवडणुकीचा सामना प्रत्येक विधानसभा निवडणुकीला रंगत असतो. ते एकमेकांचे पारंपरिक विरोधक असल्याचे देखील बोलले जाते. यावेळी दिलीप सोपल यांनी राजेंद्र राऊत यांना शह देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला. कारण युतीत बार्शीची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली आहे. तर राजेंद्र राऊत हे भाजपमध्ये आहेत. आपण शिवसेनेत जाऊन राऊत यांचे तिकीट कापू आणि त्यांना अपक्ष उभा राहण्याची वेळ आणू असे दिलीप सोपल यांना वाटले होते. जर बार्शी भाजपला सोडण्याचा निर्णय झाला असेल तर दिलीप सोपल यांची राजकीय खेळी बारगळली असेच म्हणावे लागणार. तूर्तास युतीच्या आणि जागावाटपाच्या घोषणेची वाट बघणेच उचित राहणार आहे.

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

तर मी खासदारकीचा राजीनामा देवून पुन्हा निवडणुकीला सामोरे जाईल : खासदार अमोल कोल्हे

Breaking | उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ; काँग्रेस सोडण्याचे सांगितले ‘हे’ कारण