सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाराष्ट्र बंदमध्ये जाणीवपूर्वक कोणी बळजबरी करत असेल तर त्याला अटकाव करा. ज्यांना बंद पाळायचा असेल त्यांना पाळूद्या. ज्यांना बंदमध्ये सामील व्हायचे नसेल त्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये, अशी आपली व भूमिका असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी
राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून सातारा शहरातील पाहणी केली. सातारा शहरातील पोवई नाका, बसस्थानकर परिसर, देवी चाैक, राजवाडा परिसर तसेच मुख्य बाजारपेठ या मार्गाची शंभूराज देसाई यांनी पाहणी केली. यावेळी शहरात महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कुणालाही त्रास होवू नये, पोलिस प्रशासन म्हणून आमची जबाबदारी आहे. सकाळी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुपारनंतर काही दुकाने, अस्थापना थोड्या प्रमाणात दुपारी सुरू झाली आहे. शिवसेना म्हणून सामान्य जनतेला त्रास होवू नये अशी भूमिका आहे. अनावधानावपणे अशी काही बाचाबाची झाली असेल तर योग्य नाही. अशा प्रकारे गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांला पक्षाकडून नक्कीच समज दिली जाईल.