ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर करण्यात आला आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे ही घोषणा करत अभिनंदन देखील केले आहे. त्यामुळे सध्या सर्व बाजूंनी अशोक सराफ यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे

आज अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, अशोक सराफ यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले. तसेच त्यांनी मालिकांमध्ये देखील मुख्य भूमिका तसेच सहकालाकाराची भूमिका साकारली. अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 साली झाला. अशोक सराफ यांना त्यांचे चाहते लाडाने अशोक मामा असे म्हणत. आपल्या अभिनयातून अशोक सराफ यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी, धुमधडाका, गंमत जंमत, अशी ही बनवाबनवी , नवरा माझा नवसाचा, आयत्या घरात घरोबा अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले.