मुंबई । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर केली. मात्र, राज्यातील कार्यकारणीत पंकजा मुंडेंना स्थान मिळालं नाही. यावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजपने आज जाहीर केलेल्या राज्य कार्यकारणीत पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचा समावेश करत त्यांचे पुनर्वसन केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेले चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस हे पद देण्यात आलं आहे. याचसोबत विनोद तावडे, एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान असेल, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानपरिषदेचं तिकीट नाकारल्यानंतर पंकजा मुंडेंना भाजपच्या राज्य कार्यकारणीत महत्वाची जबाबदारी देण्यात येण्याची चर्चा होती. दरम्यान, आज जाहीर केलेल्या भाजप कार्यकारणीत पंकजा मुंडेंचे नाव गायब असल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं असताना चंद्रकांत पाटील यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. पंकजा मुंडेंना केंद्राय कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या त्या १०० टक्के असतील. केंद्रातली जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल असं चंद्रकांत पाटील यांनी काही आज पत्रकार परिषदेत जाहीर केलं. शिवाय प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या २ वेगळ्या खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई नाराज आहेत म्हणून त्यांना ही जबाबदारी दिली असं काहीही नाही. आमच्या पक्षात कुणीही नाराज नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.
कोरोना संकटामुळे भाजपाची कार्यकारणी जाहीर करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते, त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर १२ प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ५ सरचिटणीस आहेत. त्याशिवाय एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटन असे ६ सरचिटणीस आहेत. एक खजिनदार आणि १२ सरचिटणीस असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
भाजपची कार्यकारिणी
सरचिटणीस – चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, सुजितसिंह ठाकुर, रवींद्र चव्हाण
उपाध्यक्ष – राम शिंदे, संजय कुटे, माधव भंडारी, प्रीतम मुंडे, प्रसाद लाड, जयकुमार रावल, कपिल पाटील, भारती पवार
प्रदेश कार्यकारिणी सदस्य (विशेष निमंत्रित)- विनोद तावडे, एकनाथ खडसे, नारायण राणे, गणेश नाईक, प्रकाश मेहता
विधानसभा मुख्य प्रतोद- आशिष शेलार
विधानसभा प्रतोद- माधुरी मिसाळ
किसान मोर्चा अध्यक्ष- अनिल बोंडे
कोषाध्यक्ष पदावर शायना एन सी यांच्याऐवजी मिहीर कोटेजा यांची नियुक्ती
केशव उपाध्ये- मुख्य प्रवक्ते
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”