मुंबई । महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. संजय कुमार यांना करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत असल्याने ते होम क्वारंटाइन आहेत. राज्याचे सचिव म्हणून ते अनेक बैठकांना हजर असतात. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चिंता वाढली आहे.
मागील आठवड्यात २२ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीला संजय कुमार हजर होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी संजय कुमार यांना सौम्य लक्षणं जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. ज्यानंतर त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान वाढताना दिसतं आहे. लोकप्रतिनिधींनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. दरम्यान संजय कुमार यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मंत्रालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे.
जून महिन्यात संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. कोरोना नियंत्रणासाठी ते मागील काही महिन्यांपासून नेटाने प्रयत्न करत होते. तसेच राज्यातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. संजय कुमार हे भारतीय प्रशासन सेवेच्या १९८४ च्या बॅचचे आहेत. ३६ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.