काँग्रेसचा आजपासून ‘महापर्दाफाश’ सभांचा शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता आता महाराष्ट्रात कॉंग्रेसने ‘महापर्दाफाश सभा…घालवूया लबाडांचे सरकार’ असे घोषवाक्य घेवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहे. बीजेपीच्या ‘महाजनादेश’ व राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज्य’ यात्रेच्या धर्तीवर आजपासून अमरावती येथून कॉंग्रेसची ‘महापर्दाफाश’ सभा सुरू होणार आहे.

महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून काँग्रेस फडणवीस सरकारच्या ‘महाजनादेश’ यात्रेची ‘पोलखोल’ करणार आहे. या सभेला गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार आहे.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. तर पुढील टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , कोकण- मुंबई या विभागात सभा होणार आहेत.

यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापूरासारख्या आपत्तीत सापडलेले असताना आपत्तीग्रस्त जनतेला वा-यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. काँग्रेस राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार असून सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली सभा होणार आहे.

या यात्रांमधुन प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने शक्तिप्रदर्शनाचे फंडे वापरणार आहे. यात कोणता नेता सत्ताधाऱ्यांवर व विरोधकांवर कसा हल्लाबोल करतो , याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र , आगामी विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाने विरोधकांसाठी भाजपची घोडदौड रोखणे आवाहानात्मक असेल.


Leave a Comment