राज्यात कोरोनाची संख्या ३८ वर, यवतमाळ येथे आणखी एक रुग्ण

0
73
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ | राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. एक नवा रुग्ण यवतमाळमध्ये आढळून आला आहे.यवतमाळमधील रुग्णांची संख्या तीनवर पोहोचली आहे. तर राज्यात एकूण ३८ रुग्ण झाले आहेत. मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आता अमरावतीमधील रुग्णाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातल्या १० शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले.

आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती करण्यात आलेल्या संशयिताचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळमध्ये रुग्णांची संख्या तीन झाली आहे. दुबईहून आलेल्या नऊ संशयित रुग्णा पैकी हे तीन रुग्ण आहेत. या आधी दोन जण पॉझिटीव्ह तर आज एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तर जालन्यात कोरोनाचा दुसरा संशयित रुग्ण आढळला आहे.

मुंबईत तीन तर नवी मुंबईत एक अशा चार रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतल्या रुग्णांची आठ तर नवी मुंबईत आता दोन रुग्ण झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here