सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
साताऱ्यात शाहू स्टेडिअम येथे राष्ट्रध्वज फडकवून 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन समारंभ कार्यक्रम पार पडला.
यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती. यानिमित्ताने पोलिसांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी परेडद्वारे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, सौ. संगीता साळुंखे, जयवंतराव साळुंखे, भरत देशमुख तसेच जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी व स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते. तसेच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांची पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी भेट घेवून शुभेच्छा दिल्या. दरम्यान राज्याचे महासंचालकपदक प्राप्त पोलिसांचा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर निर्बंध शिथील करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याची उन्नती व्हावी, यासाठी 105 हुत्मात्यांनी बलिदानी आहुती दिली. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आ. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या शुभहस्ते राज्याचा मंगल कलश आणण्यात आला. आज जिल्हा परिषदेच्या स्थापनेलाही 60 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.