शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार
शालेय विद्यार्थ्यांसाठी १ मे म्हणजे शालेय शैक्षणिक वर्षातील निकालाचा दिवस, आनंदाचा दिवस असतो. परंतु कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे यावर्षी विना परीक्षा सरसकट विद्यार्थ्यांना उतीर्ण करण्यात आले असून तो निकाल ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांपर्यंत कळविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्याचा 61 वा महाराष्ट्र दिन शारदा रवींद्र जोशी या विद्यार्थींनीने घरीच साजरा केला आहे.
परंतु कोरोनाच्या या संकटामुळे या वर्षी हा दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर येथील न्यू इंग्लिश स्कूल फॉर गर्ल्स, या शाळेची विद्यार्थीनी शारदा रवींद्र जोशी हीने आपल्या घरीच सुरक्षितपणे, काळजी घेऊन महाराष्ट्रीयन नऊवारीसाडी, दागिने असा सुंदर अस्सल मराठमोळा पेहराव करून मोठ्या उत्साहाने साजरा केला. महाराष्ट्राच्या गौरवाची छान स्फूर्तीगीते गात महाराष्ट्र दिन साजरा केला. शारदाच्या कलागुणांना नेहमीच तीची आई, वडील रवींद्र जोशी व शालेय कला विभागाने प्रेरणा दिली आहे.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/2862575557340473
१ मे हा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र एक झाला. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.