मुलांना कोरोना झाला तर काय कराल? केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. देशातील ताज्या आकडेवारीनुसार मागील 24 तासात तब्बल चार लाख कोरोनाबाधित रुग्णांची देशात नोंद झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लहान मुलांना आणि तरुणांना देखील आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं लहान मुलांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत

लहान मुलांमधील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्रालयाने दोन डॉक्युमेंट जारी केले आहेत एक म्हणजे मुलांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्याबाबत नव्या गाईडलाईन आणि पीडियाट्रिक ग्रुप म्हणजे लहान मुलांच्या उपचारासंबंधी प्रोटॉकल. यामध्ये तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. सौम्य संसर्ग असल्यास काय करावं मध्यम संसर्ग आणि गंभीर संसर्ग असल्यास काय करावे ह्याची माहिती दिली आहे.

सौम्य संसर्ग असल्यास

– घसा दुखणे अशी लक्षणे असतील पण श्वासोच्छवासाला कोणताही त्रास होत नसेल म्हणजे माईल्ड इन्फेक्शन असेल तर लहान मुलांना होम आयसोलेशन मध्ये ठेवा.
-जास्तीत जास्त पातळ पदार्थ द्या त्यामुळे शरीर हायड्रेट राहायला मदत होईल.
-हलका ताप येत असेल तर दहा ते पंधरा ग्रॅम पॅरासिटामॉल द्या. मात्र गंभीर लक्षणे दिसतात तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करा.

मध्यम संसर्ग असल्यास

-ऑक्सीजन लेव्हल कमी असलेले मात्र निमोनिया ची लक्षणे असलेल्या मुलांना या कॅटेगिरी मध्ये ठेवण्यात आले आहे.
– मध्यम लक्षणे असलेल्या मुलांना कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये दाखल करावं.
-डीहायड्रेशन टाळण्यासाठी मुलांना पातळ पदार्थ द्यावेत.
– ताप आल्यास पॅरासिटामोल आणि आणखी बॅक्टेरिअल इन्फेक्शन असल्यास व ओमोक्सिसिलिंसाठी दिली जाऊ शकते.
-शरीरात ऑक्सिजन 94 टक्के पेक्षा कमी असेल तर मुलांना ऑक्सिजन द्यावा.

गंभीर संसर्ग असल्‍यास

– गंभीर इन्फेक्शन असेल तर मुलांमध्ये निमोनिया, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, मल्टी ऑर्गन इन्फेक्शन सिंड्रोम आणि सेफ्टी शोक असे गंभीर लक्षणे असतील तर अशा मुलांना तात्काळ आईसीयू किंवा एचडी मध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
– या कॅटेगरीत या मुलांचं कम्प्लीट ब्लड काउंट, लिवर फंक्शन टेस्ट आणि चेस्ट एक्स-रे करण्याचा सल्ला दिला आहे.

काही लहान मुलांच्या बाबतीत करोना संक्रमण यानंतरही कोणतीच लक्षणे दिसत नाहीत अशा मुलांवर उपचारा संबंधी काही सांगण्यात आलं नाही आहेत पण त्यांच्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला मात्र देण्यात आला आहे

You might also like