Maharashtra Din 2024| संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2024) मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. आपला महाराष्ट्र जगभरात लोककला, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि वारसा स्थळांमुळे प्रसिद्ध आहे. खास म्हणजे, याच महाराष्ट्रातील पाच ठिकाणांचा समावेश हा वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ही वारसा स्थळे नेमकी कोणती आहेत? तेथील वैशिष्ट्य काय आहेत? हे जाणून घ्या.
अजिंठा लेणी – 1983 साली UNESCO ने अजिंठा लेणीचा समावेश वारसा स्थळांमध्ये केला आहे. ही लेणी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वाघूर नदीच्या परिसरात आहे. या लेण्यांमध्ये बौद्धकालीन शिलालेख कोरलेली आहेत. तसेच, या परिसरातील लेण्यांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपामध्ये पाहिला मिळते. ही लेणी पाहण्यासाठी फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून पर्यटन येत असतात. त्यामुळेच सर्वांनाच थक्क करणारी ही लेणी जागतिक वारसा स्थळांपैकी एक आहे.
व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स – मुंबईतील या दोन्ही स्थानांचा समावेश वारसा स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 2018 साली युनेस्कोने या ठिकाणाला वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यातील आर्ट डेको इमारतींत थेटर्स, रहिवासी फ्लॅट्स आणि हॉस्पिटल आहेत. तर व्हिक्टोरियन गॉथिक ही एक सरकारी इमारती आहे. या दोन्ही इमारती 19 व्या आणि 20 व्या शतकातील इमारतींचा एक नमुना आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मुंबई शहरात सर्वात प्रसिद्ध असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे वारसा स्थळांपैकी एक आहे. या स्थळाला 2004 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात स्थान दिले आहे. यापूर्वी याच ठिकाणाला व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात असे. शिवाजी टर्मिनस हे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. (Maharashtra Din 2024)
एलिफंटा लेणी – गेट वे ऑफ इंडियापासून फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर एलिफंटा लेणी वसलेली आहे. याच लेणीला घारापुरीची लेणी असेही म्हणले जाते. 1987 साली या लेणीला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या लेणीच्या प्रवेशद्वारावरच एक मोठे हत्तीचे शिल्प साकारण्यात आले होते. त्यावरूनच या लेणीचे नाव एलिफंटा लेणी असे पडले. तसेच या लेणीत एकूण सात गुहे आहेत. आजही या लेणीला पाहण्यासाठी पर्यटक दूरवर येत असतात.
वेरूळची लेणी – 1983 साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत वेरूळच्या लेणीचा समावेश केला. तर 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ही लेणी संभाजीनगर शहरापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. या लेणीच्या परिसरातील एकूण 34 लेण्या आहेत. ज्यात 12 १२ बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेण्या आहेत. त्यामुळे या सर्व वारसा स्थळांना यंदाच्या महाराष्ट्र दिनी अवश्य भेट द्या.(Maharashtra Din 2024)