Maharashtra Economy : 2030 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट- देवेंद्र फडणवीस

Maharashtra Economy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Economy। २०३० पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मॉर्गन स्टॅनलीने आयोजित केलेल्या “इंडिया इन्व्हेस्टमेंट फोरम २०२५” कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीचा व्यापक आढावा सादर केला. २ ऑक्टोबर रोजी “विकसित महाराष्ट्र २०४७” ब्लूप्रिंटचे अनावरण केले जाईल, ज्यामध्ये अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे असतील अशी माहितीही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची औद्योगिक ताकद आता फक्त मुंबई आणि पुण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक आणि रायगड सारखे जिल्हे सुद्धा आता यात आघाडीवर आहेत, हि शहरे सुद्धा आता स्टील सिटी, इलेकट्रीक वेहिकल हब म्हणून उदयास येत आहेत. त्यामुळे फक्त १-२ शहरेच नव्हे तर संपूर्ण राज्यच औद्योगिक पॉवरहाऊस बनत आहे. नागपूर-गोवा एक्सप्रेसवे, मुंबई मेट्रो, नवी मुंबई विमानतळ, कोस्टल रोड प्रकल्पांसह १०० अब्ज डॉलर्सची मोठी पायाभूत सुविधा गुंतवणूक सध्या सुरू आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील वाहतूक आणि व्यापारी क्षेत्रात चांगलं परिवर्तन बघायला मिळेल. Maharashtra Economy

धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ८ लाख मुंबईकरांच आम्ही पुनर्वसन करतोय. तसेच यामुळे मुंबईचा चेहरामोहरही बदलणार आहे. सरकार सिंगल ट्रान्सपोर्ट कार्ड आणि एकात्मिक मोबाइल अॅपद्वारे एकीकृत गतिशीलता उपाय देखील सादर करत आहे. प्रगत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांद्वारे किनारी भाग स्वच्छ केले जात आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल 40 टक्के- Maharashtra Economy

ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत (Maharashtra Economy) सुद्धा देशात नंबर १ आहे. भारताच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा तब्बल ४० टक्के आहे असं सांगत फडणवीसांनी या यशाचे श्रेय एकात्मिक डिजिटल सिंगल-विंडो सिस्टम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक उद्यानांचा विस्तार आणि गुंतवणूक मंत्रिमंडळ समितीच्या स्थापनेला दिले.

शेतकऱ्यांसाठी पाणी सुरक्षा, तंत्रज्ञान आणि वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न यासाठीही आपण प्रयत्नशील असून ०२६ पर्यंत, सरकार दिवसा मोफत सौर वीज पुरवण्याची योजना आखत आहे असं देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल. यामुळे कृषी उत्पादकता आणि उत्पन्न वाढेल आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक फायदा होईल.