बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला; ‘असे’ असतील निकालाचे निकष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे.

यानुसार, इयत्ता दहावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज, इयत्ता अकरावीच्या गुणांचे ३० टक्के वेटेज आणि बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ४० टक्के वेटेज यावर बारावीचा अंतिम निकाल आधारलेला असणार आहे

राज्य शिक्षण मंडळाने बारावी निकालाचे निकष सीबीएसई मंडळाप्रमाणे ३०:३०:४० या सूत्रावर आधारित असतील, असे म्हटले आहे. प्रत्येक महाविद्यालयाकडून निकालासाठी  निकाल समिती स्थापन करण्यात येणार असून, निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment