निवडणूक म्हणजे ‘हमखास रोजगार योजना’; घर सांभाळून महिलांचा रोजंदारीवर प्रचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलढाणा प्रतिनिधी । महिलांचे विश्व आता केवळ कुटुंबापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्यांनी केव्हाच घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला कवेत घेतले आहे. सर्वच क्षेत्रात यशस्वी घोडदौड करणाऱ्या महिलांनी राजकीय क्षेत्रातही आश्वासक पावले टाकल्याची किती तरी उदाहरणे आहेत. राजकारण हा मध्यमवर्गीयांचा विषय नाही ही समजूतही आता कालबाह्य झाली आहे. याउलट बहुतांश निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका घेणाऱ्या महिलाही आता निवडणुकांच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र, हा प्रचार केवळ आपल्या नेत्याच्या विजयाकरिता करण्यापुरता मर्यादित राहिला नाही आहे. तर निवडणूक दरम्यान दोन पैसे कमावता येऊन पोटाची खडगी भरता येईल हे ही त्यामागचे एक कटू सत्य आहे.

त्यामुळेच राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महिलांनीही कंबर कसली असून, घरदार सांभाळून त्यांनी स्वत:ला उमेदवारांच्या प्रचारामध्ये झोकून दिल आहे. या कालावधीत शक्य तेवढा वेळ प्रचाराचे काम महिला आघाडीची फलटण करताना दिसतीये, रोजनदारीवर ह्या महिला प्रचारात उत्तरल्या असून याचा दूसरा फायदा असा की महिलांचा मतदानाचा टक्काही वाढनार आहे, त्यामुळे उमेदवार सुद्धा अशा सर्व स्तरातील महिलांना २०० ते ३०० रुपये रोज देऊन प्रचारात सामिल करुण घेत आहेत.

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात वंचित, शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी- काँग्रेस, मनसेच्या महिला आघाड्यांनी शहरातच नव्हे, तर गावोगाव प्रचाराची धुरा सांभाळली. महिलांनी शहरासह तालुका पातळीवरील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रचाराची रणनीती आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेविका, जिल्हा परिषदेचे सदस्य यांसारखी पदे भूषविणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांवर त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रचार करण्याचीजबाबदारी सोपविण्यात आली आहे.महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या पदाधिकाऱ्यांनी आपले कार्यक्षेत्र पिंजून काढलय. आपला प्रभाग सोडायचा नाही, असे स्पष्ट निर्देश पक्ष पातळीवरून महिला नगरसेविकांना देण्यात आलेत. महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रभागात घरोघरी माहिती पत्रके वाटपाचे काम सुरूये, आता या महिला कार्यकर्त्या चौकसभाही घेऊ लागल्या आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सकाळी ८ ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत महिला प्रचारकार्यात स्वत:ला झोकून देत असल्याचे दिसत आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment