महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती; पात्रता फक्त 10 वी-12 वी पास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी-12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वनरक्षक (गट क) पदाच्या एकूण 2138 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

पद संख्या – 2138 पदे
भरले जाणारे पद – वनरक्षक
नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
पगार किती – दर महिना 29,200 ते 92,300 रुपये
वय मर्यादा – 18 ते 25 वर्षे
नोकरी प्रकार – सरकारी

पात्रता काय –

1. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
2. अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी ) उत्तीर्ण केली असल्यास असा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
3. माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
4. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेला उमेदवार 10 वी उत्तीर्ण झाला असल्यास सदर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

अर्ज फी –                                                                                                                                      सर्वसाधारण प्रवर्ग – रु. 1000/-
मागास प्रवर्ग – रु. 900/-
परीक्षा – ऑनलाईन

शारीरक पात्रता –

पुरुष
उंची – 163 सेमी
छाती- 79 सेमी (84 सेमी फुगवून)
वजन- वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

महिला
उंची – 150 सेमी
छाती- लागू नाही
वजन-वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in