मोठी बातमी ! ‘या’ विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी माफ; सरकारने केले आदेश जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपले सरकार हे राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असतात. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थीकडून महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी देखील कोणत्याही प्रकारची फी घेऊ नये, असे देखील आदेश देण्यात आलेले आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या संदर्भात एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता यावर्षी शैक्षणिक वर्षांमध्ये अति मागासवर्ग प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक सामाजिक आणि आर्थिक मागास घटक आणि ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कारण त्यांना कोणत्याही प्रकारची शैक्षणिक फी भरावी लागणार नाही. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांतर्गत मान्यताप्राप्त व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. शिक्षण संस्थांनी प्रवेश घेताना जर या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले, तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई देखील करण्यात येईल. असे देखील सांगण्यात आलेले आहे.

या आधीच राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक आणि मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये देखील 100% सवलत दिलेली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर देखील शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रवर्गातील मुलींना परीक्षा शुल्क 100% माप असणार आहे. त्याचप्रमाण या नवीन निर्णयानुसार त्यांना शैक्षणिक शुल्क देखील आकारण्यात येणार नाही.