हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी जर्मनीला पाठवण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीमध्ये वाहन चालक पदावर काम देण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी हा निर्णय घेतला होता. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या कौशल्य विभाग भागाकडून बांधकाम कामगारांना इजराइलला पाठवण्यात बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि याबाबत आणि प्रयत्न देखील चालू झालेले आहे.
इस्राईलमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे इस्राईलमध्ये संपूर्ण वातावरण अस्थिर झालेले आहे. त्यामुळे वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि या सगळ्यामुळे इस्राईल मध्ये चांगल्या बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि या सगळ्या बाबत विचार करून राज्य सरकारच्या कौशल्य विभागाकडून पुढाकार घेण्यात येऊन आता कामगारांना पाठवण्यात येणार आहे. आणि यासाठी कामगारांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल विभागाकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी इस्रायल यांच्यात एक मोठे युद्ध सुरू झाले होते. आणि त्याचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर तसेच इतर अनेक क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि कामे देखील रखडलेली आहे. तसेच अनेक कंपन्यांमधून बांधकाम कामगारांची कपात झालेली आहे. त्यामुळे इथे बांधकाम कामगारांचा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातून इस्राईलमध्ये बांधकाम कामगारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि ते नोकरी देखील देण्यात येणार आहे. जे कामगार इस्राईल जाण्याची इच्छुक असेल त्यांनी जिल्हा कौशल्य आरोग्य उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा असे देखील सांगण्यात आलेले आहे. आणि या कामगारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहे.
इस्राईलला जाण्यासाठी कोणत्या अटी आहेत ?
कुशल आणि अनुभवी बांधकाम कामगारांना इस्राईलला जाण्याची संधी मिळणार आहे. यासाठी उमेदवार हा दहावी पास किंवा नापास असला, तरी चालेल तसेच कामगाराची वही 25 ते 45 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा सुरू झालेली आहे. त्यामुळे जाण्यासाठी जे बांधकाम कामगाराची इच्छुक असतील त्यांनी अर्ज करायचा आहेत.
महाराष्ट्र सरकारने काही दिवसांपूर्वी जर वुटेनबर्ग या राज्याशी करार केला होता. त्यामुळे कुशल मनुष्यबळ तिथे पुरवले जाणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वाहन चालक पुरवण्याची जबाबदारी देखील आता परिवहन विभागावर सोपवण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार ट्रक, बस आणि हलकी जड वाहने चालवणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. आणि जर्मनीत पाठवले जाणार आहे. जर्मनीत वाहन चालवण्यासाठी दर महिना अडीच लाख रुपये त्याचप्रमाणे वार्षिक 30 लाख रुपये देखील मिळू शकतात.