राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आले गोत्यात, हायकोर्टाकडून अवमानाची नोटीस जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्रातील मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून वाद ओढवून घेतल्यानंतर, आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाची नोटीस जारी करण्यात आली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने मंगळवारी कोश्यारींना अवमानाची नोटीस पाठवली आहे. थकबाकी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. कोश्यारी यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रुरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (रूलक) उत्तराखंड हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत माजी मुख्यमंत्र्यांनी सरकारी सुविधांच्या लाभापोटीचं भाडे सहा महिन्यात जमा करण्याची मागणी केली होती. हायकोर्टाने त्यानुसार कोश्यारींना भाडे भरण्याचे आदेश दिले होते. मात्र हे भाडे जमा न केल्याने, मंगळवारी कोर्टाने कोश्यारींविरोधात अवमानाची नोटीस धाडली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी 47 लाख 57 हजार 758 रुपये थकवल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. (Uttarakhand HC notice to Maharashtras Governor Bhagat Singh Koshyari )

नेमकं हे प्रकरण काय आहे?
उत्तराखंड उच्च न्यायालयात रूरल लिटिगेशन अँड एंटाइटेलमेंट केंद्राने (RLEC) याचिका दाखल केली. ही याचिका ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्र्यांना शासकीय निवासस्थान व इतर सुविधा वापरल्याची थकबाकी 6 महिन्यांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या आदेशानुसार कोश्यारी यांनी त्यांचे थकीत भाडे जमा केले नाही, त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात मंगळवारी नोटीस बजावली आहे.

राज्यपाल आणि राष्ट्रपतींवर अवमान याचिका दाखल करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी त्यांना माहिती देणे आवश्यक असते. हे लक्षात घेऊन कोश्यारी यांना 60 दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती, असे याचिकाकर्त्याने नमूद केले आहे. 10 ऑक्टोबरला त्यांनी दोन महिने पूर्ण झाल्यानंतरच न्यायालयात याचिका दाखल केली, असे सांगण्यात येत आहे. कोश्यारी यांच्याकडे 47 लाखांहून अधिक घरे आणि इतर सुविधा वापरल्याची थकबाकी आहे. याशिवाय वीज आणि पाण्याचे बिलही माजी मुख्यमंत्र्यांनी दिले नसल्याचं याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment