सातारा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. कराडमधूनही निकालाबाबतचे मोठं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण, यांना भाजपनं धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात विजय मिळवला आहे. इथं, भाजप-अतुल भोसले गटाला 12 जागा तर अपक्षला 1 जागा मिळाली आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे. पृथ्वीराज चव्हाण, यांना अतुल भोसले गटाने मोठा धक्का दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
तर दुसरीकडे, विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलसमोर विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणीला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’