महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तिजोरी फोडण्याचा प्रयत्न; पोलिस तपास सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
जिल्ह्यात सध्या चोरांचा सुळसुळाट झाला असून गुरुवारी मध्यरात्री मानवत रोड येथे राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत बँकेतील तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मानवत तालुक्यातील मानवत रोड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक६१ च्या बाजुला सेलू कॉर्नर जवळ महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा आहे. आज महाशिवरात्री तर उद्या आठवड्यातील चौथा शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुटी आल्याने बँकेचे कर्मचारी आपले कामकाज आटपून गुरुवार दि.२० फेब्रुवारी रोजी बँक बंद करून निघून गेले होते. या संधीचा फायदा घेत गुरुवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी बँकेच्या भिंतीची खिडकी तोडून आत प्रवेश केला.

बँकेत असलेल्या तिजोरीला फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न या चोरट्यांकडून केला गेला असल्याचे घटनेच्या ठिकाणी दिसून आले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेतील काहीही चोरी केल्याचे यावेळी आढळून आले नाही. घटनेची माहिती मिळताच सपोनि शिवाजी पवार, जमदार फारुकी, प्रताप साळवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून ठसे तज्ञ आणि श्वानपथकाला यावेळी पाचारण करण्यात आले होते.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.