मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी मुंबईत आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. या बातमीने त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला. अभिनेता सुशांतने आत्महत्या कारण्यामागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण मुंबई पोलीस याचा तपास करत आहेत. यावर प्रतिक्रिया देतांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं की, ‘सुशांतची आत्महत्या ही दुर्देवी आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणात सध्या काही संशयास्पद आढळलं नाही. मात्र, काही वेगळं असेल तर त्या अँगलनेसुद्धा पोलीस तपास करतील.’ असं आश्वासक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सुशांतच्या आत्महत्येमागे कट असल्याचं वक्तव्य त्याचा चुलत भाऊ आमदार नीरज बबलू यांनी केलं आहे. ते म्हणाले की, ‘जो व्यक्ती इतरांचा आत्मविश्वास वाढवायचा तो असं काही करू शकतो यावर विश्वास बसत नाही. त्याच्या आत्महत्येमागे कट आहे की नाही हे त्याठिकाणी गेल्यावरच कळेल. सुशांतचा एक मेहुणा पोलीस अधिकारी आहे. ते या प्रकरणाची तपासणी करत आहेत.’ असं देखील निरज बबलू यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनवर उपचार घेत होता. तो क्लिनिकल डिप्रेशनचा बळी होता. अशा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, पोलिसांना अद्याप याची खातरजमा करायची आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in