‘आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा’; अनिल देशमुखांच्या आठवलेंना हटके शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर । केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवेल यांचा आज वाढदिवस आहे. आज सकाळपासूनच आठवलेंवर त्यांच्या समर्थकांपासून ते राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सार्वजनिक आयुष्यात कविता करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. प्रसंग कोणताही असो आठवले आपल्या हटके यमक शैलीत कविता करण्यात तरबेज आहेत.

राजकारणात त्यांनी आपल्या कवितांमधून भल्याभल्यांना टिपले आहे. अगदी कोरोना काळातील त्यांच्या ‘गो कोरोना गो’ हा नाऱ्याबद्दल वेगळं सांगायला नको. राजकारणातील शीघ्र कवी रामदास आठवले यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांच्याच स्टाईलने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्विटवर एक कविता ट्विट करत आठवले यांना राजकारणातील दबंग कवी म्हणतं अनिल देशमुखांनी एकप्रकारे कोपरखळी मारत खेळीमेळीत शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरवर केलेल्या कवितेत देशमुख लिहितात,

”बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आठवले स्टाईल कवितेवर नेटकरी फिदा झाले असून अनेक त्यांच्या कवितेला रिट्विट करत आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment