नाशिक प्रतीनिधी / भिकन शेख
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या हाडांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई नाशिकचे अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या विशेष पथकाने केली असून रविवारी सायंकाळी या पथकाने परिसरातील चार ते पाच बेकायदेशीर कारखाने सीलबंद केले.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होत. शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या आठवड्यात मोठी जनावरे फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रविवारी या पथकाने बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हाडे व चरबी कारखान्यावर कारवाई केल्याने या कारखान्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे उघड झाले आहे.
विशेष पोलीस पथकाने या विषयी माहिती मिळाल्यावर रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणी असलेले हाड उकळण्याचे साहित्य पालिका प्रशासनाच्या मदतीने ते नष्ट केले जाणार आहे.
इतर महत्वाचे –
प्रकाश आंबेडकर पहिल्या दिवसापासूनच भाजपला विकले गेले आहेत – पृथ्वीराज चव्हाण
निवडणुक अर्ज भरण्यासाठी त्याने आणली चक्क १७ हजार रुपयांची चिल्लर