तृतीय पंथीय उमेदवार मोना तुपलोंंढे यांचा वंचित बहुजनला पाठिंबा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी

    जिल्ह्यातील इतिहासात प्रथमच तृतीयपंथीने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रविकास सेनेच्यावतीने मोना तूपलोंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र आज त्यांना तृतीयपंथीयांच्या संघटनेने त्यांची भेट घेत समजूत काढत, तृतीयपंथीयांच्या संघटनेने वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला आहे त्यामुळे वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लढत असल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचे जाहीर केले.

  सामाजिक न्यायापासुन वंचित असणाऱ्या तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या सर्व समस्यांंचा पाठपुरावा करण्यासाठी सांगली मध्ये राष्ट्र विकास सेनेच्यावतीने मोना तुपलोंंढे यांनी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली होती. जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच पहिल्यांदा तृतीयपंथीयाने लोकसभेसाठी उमेदवार उभा राहणार होता.

    मात्र तृतीयपंथी नेत्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या दिया शेख यांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थेट सांगली मध्ये येत त्यांची समजूत काढली आणि तृतीय पंथियांनाही सर्व समाजाच्या सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तृतीयपंथीयांनी पाठिंबा दिला आहे.त्यामुळे मोना तुपलोंढे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची त्यांना विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान्य करून आपली जाहीर केलेली उमेदवारी मागे घेऊन या वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देत असल्याचे मोना तुपलोंंढे यांनी जाहीर केले.

प्रकाश आंबेडकरांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

Leave a Comment