सांगली प्रतिनिधी / सांगली लोकसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज झाली. प्राप्त अर्जापैकी आ. सुधीर गाडगीळ यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. वीस उमेदवारांचे २६ अर्ज वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीचा सोमवारी अंतिम दिवस आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातून कोण-कोण माघार घेणार याकडे लक्ष लागले आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीत छाननी झाली. या छाननीमध्ये भाजपाकडून डमी असलेला आ. सुधीर गाडगीळ यांचा एकमेव अर्ज अवैध ठरला. तर २० उमेदवारांचे २0 अर्ज वैध ठरले. अर्ज अवैध ठरु नये यासाठी उमेदवारांनी वकीलांची यंत्रणा तयार ठेवली होती. मात्र अर्जावर विरोधी उमेदवारांकडून हरकत घेण्यात आली नसल्याने अर्ज वैध ठरले. प्रमुख उमेदवारासह दाखल बहुतांशी अर्ज वैध ठरल्याने आता माघारीकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी माघारीचा अंतिम दिवस असून त्यानंतर निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे अर्ज वैध ठरलेल्यामध्ये भाजपा-शिवसेना युतीचे संजयकाका पाटील, कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून विशाल पाटील, बहुजन वंचित आघाडीकडून गोपीचंद पडळकर याच्यासह अधिक बन्ने, अपक्ष अशोक माने, अभिजित बिचुकले, नानासो बंडगर, शंकर माने, भक्तराज ठिगळे, ऋुषीकेश साळुंखे, महाराष्ट्र क्रांती सेना, राजेंद्र कवठेकर बहुजन मुक्ती, सचिन वाघमारे अपक्ष, अंकुश घुले अपक्ष, राजेंद्रप्रसाद जगदाळे साभिमानी, अजितराव पाटील बहुजन मुक्ती पार्टी, दत्तात्रय पाटील बहुजन वंचित पार्टी, नारायण मुळीक अपक्ष, आनंदा नलगे बळीराजा पार्टी, अल्लाउद्दिन काझी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.
इतर महत्त्वाचे –
स्वीप मोहिम बनली लोकशाही शिक्षणाची कार्यशाळा
अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालूकाक्यात वादळी वार्यासह अवकाळी पावसाची हजेरी …
संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त निघाली मूक पदयात्रा