पवारांचा प्रचार करायचा असेल तर, भाजपकडून मिळालेले पद सोडा…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढपूर प्रतिनिधी | लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेना- भाजप यांची युती झाली, राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस यांच्या महाआघाडीच्या प्रचार सभेला काल पासून सुरवात झाली. आता कोणला कुठे उमेदवारी द्यायची याची खलबत सुरु झाली आहेत.

राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. संजय शिंदे हे भाजपशी जोडले असल्याने त्यांच्या या भेटीवर अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत.त्यातच सहकारमंत्र्यांनी त्यांना शरद पवारांचा प्रचार करायचा असेल तर, भाजप कडून मिळालेले पद सोडावे असे सांगितले होते, तरीही त्यांनी पवारांची भेट घेतली.यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते.

संजय शिंदे हे माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू आहेत.शरद पवार यांच्या पिंपळनेर येथे झालेल्या बैठकीत संजय शिंदे यांना स्टेजवर येण्यास आग्रह होत होता.

 

इतर महत्वाचे –

साताऱ्यात उदयन राजेंना भाजपकडून प्रतिस्पर्धी कोण ?

नपिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या 

शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Leave a Comment