शरद पवारांसमोर कार्यकर्त्यांचा राडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


सातारा प्रतिनिधी |    
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेची आगामी निवडणूक माढा मतदार संघातून लढविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यांच्या या माढा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत गटबाजी असल्याचे उघड झाले. शरद पवारांनाही याचा अनुभव आला.दोन गटांमधील वाद पवारांसमोर उघड झाला.

साताऱ्यात शरद पवार बोलत असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. या वेळी पोलिसांना मध्यस्ती करावी लागली एवढा हा वाद टोकाला गेला होता. गोंधळामुळे पवार यांनी आपले भाषण थांबविले. माण तालुक्यात आमदारकीच्या स्पर्धेत शेखर गोरे आणि कविता म्हात्रे यांच्यात टोकाचा अंतर्गत वाद आहे. या वादामुळे सभेत म्हात्रे व्यासपीठावर गेल्याने गोरे यांनी व्यासपीठावर न येण्याचा निर्णय घेतला,सर्वांनी त्यांनी वर येण्यास विनंती केली मात्र ते खालीच बसले.

म्हात्रे यांचे भाषण सुरु होताच गोरे समर्थकांनी ‘सर्व सांगा, खार सांगा’ असं म्हणत गोंधळ घालायला सुरवात केली. या वादात खुद्द शरद पवारांना पुढाकार घ्यावा लागला.त्यांनी कार्यकर्त्यांना शांत होण्यास सांगितले, तरीही कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकले नाही.

 

इतर महत्वाचे – 

पंतप्रधान मोदी यांना २०१८ चा सोल पीस पुरस्कार मिळाला

दोन- तीन दिवसात तलाठी पदासाची जाहिरात निघणार – चंद्रकांत पाटील

आरक्षण द्या आश्वासन नको – धनगर आरक्षण शिष्टमंडळ

IMG-20190220-WA0005.jpg

Leave a Comment